Mumbai, मे 5 -- 5 Types of Raita Recipe: उष्णतेमुळे सर्वांना त्रास होतो. अशा परिस्थितीत संपूर्ण शरीर थंड ठेवण्यासाठी हेल्दी थंड पदार्थ खाणे आवश्यक आहे. तज्ञ या काळात ताजे आणि हलके अन्न खाण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्यात जेवणाला चव सुद्धा येत नाही. अनेक भाज्या खायची इच्छा होत नाही. अशा परिस्थितीत जेवणाला चवदार बनवण्यासाठी तुम्ही जेवणासोबत रायता सर्व्ह करू शकता. दरवेळी एकच रायता खाण्याचा तुम्हाला कंटाळा येत असेल तर तुम्ही या ५ वेगवेगळ्या प्रकारच्या रायताची रेसिपी ट्राय करू शकता. हे बनवायला सोपे आहे. जाणून घ्या रेसिपी.

Mango Papad: कैरीपासून बनवू शकता आंबट गोड आंब्याचे पापड, झटपट तयार होते सोपी रेसिपी

काकडीचा रायता बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात दही नीट काढून घ्या. नंतर ते चांगले फेटून घ्या. आता एक काकडी धुवून सोलून नंतर किसून घ्या. आता ही क...