Mumbai, जानेवारी 29 -- Railtel Share Price : आयटी इन्फ्रा प्रकल्पाची खरेदी आणि देखभालीसाठी मेसर्स नवोदय विद्यालय समितीकडून रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरनंतर रेलटेलच्या शेअरवर गुंतवणूकदार अक्षरश: तुटून पडले असून आज कंपनीचा शेअर ७ टक्क्यांहून अधिक वाढून ३७६.९० रुपयांवर पोहोचला.

रेलटेलचा शेअर जुलै २०२४ मध्ये ६१८ रुपयांवर होता. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक आहे. मार्च २०२४ मध्ये शेअरची किंमत ३०१.३५ रुपये होती. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर होता. शेअरच्या किंमतीचा हा प्रवास बघता हा शेअर सध्या रिकव्हरी मोडमध्ये दिसत आहे.

नवोदय विद्यालय समितीकडून रेलटेलला मिळालेल्या ऑर्डरची किंमत करासह १७ कोटींहून अधिक आहे. हे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत २७ जुलै २०२५ आहे. यापूर्वी रेलटेलला दोन मोठ्या ऑर...