Mumbai, फेब्रुवारी 9 -- Rahul solapurkar controversial statement : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एका मुलाखतीत राहुल सोलापूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आले होते, तसेच डॉ. आंबेडकर वेदानुसारब्राह्मणअसल्याचे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या असून सोलापूरकर यांनी आंबेडकरांच्या पायावर नाक घासून माफी मागावी;अन्यथा त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे.रिपाइं खरात गटाचे नेते सचि...