New delhi, फेब्रुवारी 3 -- गेल्या वर्षी मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात इंडिया आघाडीला चांगले यश मिळते, मात्र त्यानंतर पाच महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव होतो. या निवडणुकीत हिमाचल प्रदेशची जितकी लोकसंख्या आहे तितक्या नव्या मतदारांची नोंदणी मतदार यादीत केली जाते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान केवळ पाच महिन्यात ७० लाख नवमतदार यादीत समाविष्ट करण्यात आले. त्याचबरोबर शिर्डीतील एका इमारतीत ७ हजार मतदारांची नोंदणी केली गेली, असा दावा करत विरोधा पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपसह निवडणूक आयोगावर कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीप...