MUMBAI, फेब्रुवारी 3 -- Rahi Sarnobat Health Condition : "२०२२ ची वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि त्यानंतरच्या दोन विश्वचषकांसाठीची निवड चाचणी जिंकून मी राष्ट्रीय संघात सहभागी होण्यासाठी दिल्लीला निघणार होते, तिथून आम्हाला इजिप्तला जायचे होते.

मी माझ्या घराच्या दारात होते, तेव्हा अचानक माझ्या हृदयाचे ठोके वाढले. मला उष्ण वाटू लागले आणि विचित्र पद्धतीने संपूर्ण अंगात मुंग्या येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर संपूर्ण शरिरात तीव्र वेदना जाणवू लागल्या. मला वाटलं मी मरेन. यानंतर मला लगेच दवाखान्यात नेण्यात आले. यानंतर माझा ईसीजी झाला तेव्हा माझ्या हृदयात सर्वकाही व्यवस्थित होते.'

हे शब्द आहेत, भारताची प्रसिद्ध नेमबाज राही सरनोबत हिचे. राही सरनोबत भारताची सर्वोत्कृष्ट पिस्तुल नेमबाज. कोल्हापूरच्या राही सरनोबतने २५ मीटर पिस्तुल नेमबाजीच्या अनेक आंतरराष्ट्...