भारत, फेब्रुवारी 12 -- रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जाऊन सहकुटुंब महाकुंभमेळ्याला भेट दिली. मुकेश अंबानी यांच्यासोबत त्यांची आई कोकिळाबेन अंबानी, मुलगा आकाश आणि अनंत अंबानी, सून श्लोका मेहता राधि आणि राधिका मर्चंट यांच्यासह नातवंडे पृथ्वी आणि वेदा यांचा समावेश होता. माघ पौर्णिमेच्या पूर्वसंध्येवर अंबानी कुटुंबीयांनी गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या पवित्र संगम असलेल्या त्रिवेणी संगमावर स्नान केले.

या पवित्र यात्रेसाठी संपूर्ण अंबानी कुटुंबाने पारंपारिक पोशाख परिधान केला होता. मात्र सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चा अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांच्या ट्रॅडिशनल लूकची जोरदार चर्चा आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांची धाकटी सून, अनंत अंबानी याची पत्नी राधिका अंबा...