Mumbai, जानेवारी 29 -- Suzlon Energy Q3 Results : गेल्या काही दिवसांपासून घसरत चाललेल्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये आज जोरदार वाढ झाली आणि शेअरला अप्पर सर्किट लागलं. डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर शेअरमध्ये ही वाढ झाली आहे. या तेजीनंतर मार्केट एक्सपर्ट्सनी शेअरच्या टार्गेटमध्ये वाढ केली आहे.

बीएसईवर सुझलॉनचा शेअर आज ५ टक्क्यांनी वाढला आणि ५२.७६ रुपयांवर पोहोचला. डिसेंबर २०२४ तिमाहीत सुझलॉन एनर्जीच्या नफ्यात ९१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुझलॉन एनर्जीचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ८६.०४ रुपये असून ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३५.४९ रुपये आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत सुझलॉन एनर्जीला ३८७ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. वार्षिक आधारावर ऊर्जा कंपनीच्या नफ्यात ९१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत स...