Mumbai, जानेवारी 27 -- Bank Stock News : प्रोजेक्ट फायनान्सर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी (आयडीएफसी) आणि कॅपिटल फर्स्ट यांच्या बँकिंग शाखेचे विलीनीकरण करून स्थापन झालेल्या आयडीएफसी फर्स्ट बँकेचे तिमाही निकाल नुकतेच जाहीर झाले. हे निकाल अपेक्षेपेक्षा वेगळे लागल्याचा मोठा परिणाम शेअरवर झाला. बँकेचा शेअर ७ टक्क्याहून जास्त घसरून ५७.६८ रुपयांवर आला.

बँकेचा निव्वळ नफा ५३ टक्क्यांनी घसरून ३३९.४ कोटी रुपयांवर आला आहे. विश्लेषकांच्या ५५१ कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा हा आकडा बराच कमी आहे. निव्वळ नफ्यात झालेली घसरण, ओपेक्समधील वाढ आणि वाढीव तरतुदींमुळं नफ्यात ही घट झाली आहे.

आर्थिक वर्ष २०२५ च्या सप्टेंबर तिमाहीतील २०१ कोटी रुपयांच्या तुलनेत निव्वळ नफा ६९ टक्क्यांनी वाढला आहे. तथापि, आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत निव्व...