Mumbai, जानेवारी 28 -- Share Market News : कंडक्टर, केबल्स, स्पेशालिटी ऑईल, पॉलिमर आणि ल्युब्रिकेंट्सची उत्पादक आणि पुरवठादार असलेल्या अपार इंडस्ट्रीजचे शेअर्स आज तब्बल २० टक्क्यांनी कोसळले. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालाचा हा परिणाम आहे. डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात वाढ झाली असली तरी कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे.

अपार इंडस्ट्रीजचा एकत्रित नफा तिसऱ्या तिमाहीत १९.७ टक्क्यांनी घसरून १७५ कोटी रुपयांवर आला आहे. व्याज, अवमूल्यन, कर आणि अमोर्टायझेशन (EBITDA) पूर्वीचे उत्पन्न वार्षिक ७.१ टक्क्यांनी घटून ४०१ कोटी रुपयांवर आलं आहे.

आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचा महसूल १७.७ टक्क्यांनी वाढून ४,७१६ कोटी रुपयांवर पोहोचला असून, देशांतर्गत व्यवसायात ३१.८ टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत निर्यात विभागाचं...