Mumbai, जानेवारी 30 -- Adani Group Companies : अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचे डिसेंबरच्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले असून कंपनीचा निव्वळ नफा १४ टक्क्यांनी वाढून २५१८.३९ कोटी रुपये झाला आहे.

मागील आर्थिक वर्ष २०२४ च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २२०८.२१ कोटी रुपये होता. कंपनीच्या महसुलातही वार्षिक आधारावर मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा कामकाजातून ७,९६३.५५ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हा आकडा ६९२०.१० कोटी रुपये होता.

डिसेंबर तिमाहीत अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे व्याज, कर, अवमूल्यन आणि अ‍ॅमॉर्टायझेशनपूर्वीचं (EBITDA) उत्पन्न ४,८०२ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत अदानी पोर्ट्सचा एबिटा १९ टक्क्यांनी वाढून १४,०१९ कोटी र...