भारत, जानेवारी 30 -- अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल अभिनीत 'पुष्पा २: द रूल' हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याची माहिती समोर आली होती. आता हिंदी भाषेतील सिनेमा कुठे आणि कधी पाहायला मिळणार याविषयी माहिती समोर आली आहे.

बुधवारी नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'पुष्पा २: द रूल' या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. तसेच हा टीझर शेअर करत हिंदी भाषेतील सिनेमा ३० जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे.

नेटफ्लिक्स इंडियाने पुष्पा २ सिनेमाच्या ओटीटी रिलिजची घोषणा करत, 'पुष...