Mumbai, जानेवारी 29 -- Punha Kartavya Aahe Latest Update : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका 'पुन्हा कर्तव्य आहे'मध्ये सध्या खूप घडामोडी घडताना दिसत आहेत. एका बाजूला वसुंधराचे पाय पकडून विशाखा मदतीसाठी विनंती करत आहे. विशाखा कर्जाच्या डोंगराखाली अडकली आहे. एक-दोन नव्हे तर तिच्यावर तब्बल ५० लाखांचं कर्ज झालं आहे. याच कर्जातून बाहेर पडण्यासाठी विशाखा तिच्या मुलीची म्हणजेच तनयाची मदत मागत आहे. तर, तनया घरातील सगळ्यांपासून लपून कंपनीतील ५० लाख विशाखाला देत असते. मात्र, त्याचवेळी हा प्लॅन वसुंधराला कळल्यामुळे तिने हा प्लॅन उधळून लावला होता. आता तनया तिच्यासमोर हात जोडून पैसे मागणार आहे.

आता वसुंधरा तिला पैसे देण्यासाठी एक अट ठेवणार आहे, की विशाखाने एक कोऱ्या कागदावर सही करावी. सही केल्यावर वसुंधरा त्या कागदावर लिहिते की, तनयाला घरातील सगळे का...