Pune, एप्रिल 19 -- Pune yerwada firing : पुण्यात बंदूकबाजांची पुणे पोलिस आयुक्तांनी झाडाझडती घेतली होती. मात्र, या घटनेनंतर गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात गोळीबाराच्या घटनांत वाढ झाली आहे. मंगळवारी जंगलीमहाराज रस्ता, बुधवारी हडपसर तर गुरुवारी सिंहगड रस्त्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतांना आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जुन्यावादातून एकावर गोळीबार करण्यात आला. ही घटना येरवडा येथील अग्रेसन स्कूलच्या परिसरात घडली.

विकी चंदाले असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आकाश चंदाले असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जखमी आणि आरोपी यांच्यात जुना कारणावरून भांडण आणि वाद होते. तर दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, याच वादातून त्याने विकीवर गोळीबार केल्याची माहिती आहे.

पोलिसांनी...