Pune, फेब्रुवारी 5 -- Pune Water News : पुण्यात जीबीएस आजाराने थैमान घातले आहे. पुण्यात सिंहगड रस्ता परिसरात सर्वाधिक जीबीएस बाधित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेने पुण्यातील पाणी स्त्रोतांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. यात खासगी पाणी शुद्धिकरण प्रकल्पातील (आरओ प्लॅट) व इतर काही ठिकाणचे पाणी दूषित असल्याचं पुढं आलं आहे. या घटनेमुळे पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी खासगी टँकर व आरओ प्रकल्पांवर थेट कारवाईचे आदेश पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत.

पुण्यात सिंहगड रस्ता नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, थायरी, डीएसके विश्व, आंबेगाव या परिसरात गुलेन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. पुण्यात सध्या ११९ जीबीएस बाधित रुग्ण आहेत. यानंतर पालिकेने या पर...