पुणे, मे 8 -- Pune warje firing : पुण्यात खून, दरोडे, चोऱ्या, गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. दोन खून होण्याची घटना ताजी असतांना मंगळवारी बारामती लोकसभा मतदार संघाचे मतदान संपल्यावर वारजे माळवाडी येथील रामनगर भागात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे या परसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पुण्यात काल बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाले. या मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. वारजे माळवाडी हा भाग बारामती लोकसभा मतदार संघातील खडकवासला मतदार संघात येतो. या ठिकाणी मतदान झाल्यावर रात्री ११ च्या सुमारास येथील रामनगर परिसरात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी हवेत तीन राऊंड फायर केले. या मुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

वारजे येथे मतदान शा...