Pune, जानेवारी 27 -- Pune Viral News : भारतातील आयटी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळावी या आशेत मोठ्या प्रमाणात तरुण असतात. देशात आयटी क्षेत्राकडे तरुणांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नसल्याने बेरोजगारांचे प्रमाण वाढत आहे. पुण्यात मगरपट्टा येथे असणाऱ्या यूपीएस या आयटी कंपनीत रोजगार मिळावा या आशेने मोठ्या प्रमाणात इंजिनियर तरुणांनी रांगा लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वॉकइन मुलाखतीसाठी तब्बल ३ हजार हून अधिक तरुण तरुणी रांगेत लागले होते.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पुण्यातील आयटी कंपनीत ३,००० हून अधिक अभियंते हे वॉक-इन मुलाखतीसाठी एका रांगेत उभे असल्याचा दावा केला जात आहे. ही कंपनी मगरपट्टा येथील आहे. यूपीएस या कंपनीत जॉब मिळावा या हेतूने अनेक तरुण तरुणी या कंपनीबाहेर रांगेत उभे होते...