भारत, फेब्रुवारी 26 -- Pune Swarget Bus stand Rape Crime: पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास फलटण येथे जाण्यास निघालेल्या एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पुण्यात खरचं महिला सुरक्षित आहे का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीच्या शोधासाठी पथके स्थापन करण्यात आले आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट बस स्टँडवर उभ्या असणाऱ्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. ही तरुणी एकटी तिच्या गावी जाण्यासाठी निघाली होती. ती स्वारगेट बसस्थानकात गेली होती. यावेळी ती एकटीच असल्याचा फायदा घेत आरोपीने घेत तिच्यावर शिवशाही बसमध्ये बला...