भारत, जानेवारी 27 -- पुणे शहरातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे माजी सदस्य अनिल भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अनिल भोसले यांच्यावर वर्ष २०१६ ते २०१९ या कालावधीत बँकेतून ४९४ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.

मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), २००२ अन्वये लागू असलेल्या कमाल शिक्षेपैकी निम्म्याहून अधिक शिक्षा भोसले यांनी भोगली आहे असे नमूद करत भोसले यांना दीर्घकाळ तुरुंगवासाच्या आधारावर जामीन मंजुर केला. 'या गुन्ह्यात अर्जदाराला जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. अर्जदाराने सुमारे तीन वर्षे आणि दहा महिने म्हणजे शिक्षेच्या निम्म्याहून अधिक कारावास पूर्ण केला आहे.' असं न्यायमूर्ती माधव जामदार यांनी आपल्या आदेशात म्हटले.

चार्टर्ड अकौंटंट योगेश लकडे यांनी पुण्यातील शिवाजीनगर प...