Pune, एप्रिल 15 -- Pune kondhwa Crime : पत्नीशी सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी धार्मिक तोडग्याचे आमिष दाखवून हा तोडगा यशस्वी झाल्यास स्वर्गप्राप्ती होईल अशी बतावणी करून कोंढवा परिसरात एका डॉक्टरची तब्बल ५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यानुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यास्मिन सादिक शेख, सादिक अब्दुलमजीद शेख, अम्मार सादिक शेख, एहतेशाम सादिक शेख, राज आढाव ऊर्फ नरसू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि अपहार केल्याची कलमे लावण्यात आली आहे. या प्रकरणी एका ६७ वर्षीय डॉक्टरने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फसवणूक झालेले डॉक्टर कोंढव्यातील एनआयबीएम मार्गावर राहतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदर हे डॉक्टर आहेत. ते या पू...