Pune, एप्रिल 15 -- Pune Katraj news : पुण्यात कात्रज परिसरात फाॅरेन सिटी एक्झिबेशन येथे आनंद मेळावा लागला असून या मेळाव्यात वडिलांसोबत गेलेल्या ८ वर्षांच्या शाळकरी मुलासोबत रविवारी दुर्दैवी घटना घडली. या मुलाचा विजेच्या धक्का लागल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी प्रदर्शनाचे संयोजकांसह विद्युत पाळण्याच्या मालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश राजू पवार (वय ८, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. फाॅरेन सिटी एक्झिबेशनचे संयोजक आणि विद्युत पाळण्याच्या मालकावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. गणेशचे वडील राजू पांडू पवार (वय ३७) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

या घटनेचे वृत्त असे की...