Pune, एप्रिल 14 -- Pune Junnar murder : पुण्यात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना ताजी असतांना जुन्नर तालुक्यात एका महिलेने एकतर्फी प्रेमातून तरुणाला गाडीखाली चिरडून त्याची हत्या केल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे घडली. या प्रकरणी आरोपी महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

साबीर मोहम्मद शफी ब्यापारी (वय ४५, रा. पणसुंबा पेठ, जुन्नर, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणी अभिजीत सोनवणे (वय २८, रा. डिंगोरे, ता. जुन्नर), जेबा इराफान फकीर (वय ३२, रा. पणसुंबा पेठ, ता. जुन्नर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महतीनुसार साबीर आणि जेबा दो...