Pune, फेब्रुवारी 13 -- Pune GBS Update : पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चा कहर वाढत आहे. बुधवारी आणखी एका जीबीएस बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी ६ जणांना या आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. दरम्यान, पुणे महापालिकेने या आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या आरोग्याचा फॉलोअप देखील घेण्यास सुरुवात केली आहे.

पुण्यात बुधवारी आणखी एका संशयित जीबीएसबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. खडकवासला येथील ५९ वर्षीय व्यक्तीचा काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्यक्तीला हायपोटेन्सिव्ह शॉक, पल्मोनरी एम्बोलिझम आणि जीबीएस असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे राज्यातील एकूण जीबीएस मृत्यूंची संख्या ८ झाली आहे, अशी माहिती पीएमसीच्या आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, जीबीएसमुळ...