Pune, फेब्रुवारी 3 -- Pune GBS Outbreak: पुण्यात जीबीएस आजारामुळे नागरिकांची चिंता वाढली असून रुग्णांची रोज वाढत आहे. पुण्यात रविवारी जीबीएसचे १० रुग्ण आढळले असून, यामुळे रुग्णांची संख्या ही १५८ झाली आहे. राज्यात एकूण जीबीएस रुग्णांची संख्या १५८ पेक्षा जास्त झाली आहे. यातील २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून पुण्यात ५ रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात जीबीएस बाधित रुग्णांचा उद्रेक झाला आहे. पुण्यात १५८ रुग्ण सापडले असून यातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात १२७ रुग्णांचे जीबीएस चाचणी अहवाल, पॉझिटिव्ह आले आहे. यातील ३१ रुग्ण हे पुणे मनपा हद्दीतील आहे. तर ८३ रुग्ण हे नव्याने पुणे मनपा अंतर्गत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आढळले आहे. तर १८ रुग्ण प्रिपरी चिंचवड मनपा व १८ रुग्ण पु...