Pune, एप्रिल 25 -- Pune bibvewadi Crime : पुण्यात बिबवेवाडी येथे एका तरुणाने त्याच्या आईच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे लागत असल्याने व आर्थिक अडचणीत असल्याने शेजाऱ्याचे बंद घर फोडून घरातील दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाला अटक केली असून त्याच्यावर बिबेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडून चोरी केलेले सव्वा सात लाख रुपयांचे दागिने देखील जप्त करण्यात आले आहे.

दीपक नामदेव पाटोळे (वय ४१) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शेजाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार बिबवेवाडी पोलीस ‌ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक हा बेरोजगार आहे. तो व त्याची वृद्ध आई बिबवेवाडीतील एका सोसायटीत राहतात. गेल्या काही महिन्यांपासून तो आर्थिक अडचणीत होता....