भारत, फेब्रुवारी 28 -- Dattatray Gade Arrested: पुण्यासह अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीला मध्यरात्री पुणे पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. आरोपी हा घटनेनंतर त्याच्या शिरूर तालुक्यातील मूळ गावी गुणाट येथे लपून बसला होता. पुणे पोलिसांनी ड्रो, डॉग स्कॉड आणि इतर तंत्रज्ञानाच्या साह्याने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी दत्ता गाडेला पुण्यात आणण्यात आले असून त्याची ससूनमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्याला आज ११ वाजता शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे.

दत्तात्रय गाडे याने मंगळवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास फलटण येथे जाणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केला होता. यानंतर आरोपी दत्तात्राय गाडे हा फरार झाला होता. तो शिरुर तालुक्यातील गुनाट गावात लपून बसल्याच...