भारत, फेब्रुवारी 28 -- पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला पोलिसांनी रात्री दीड वाजता शिरुर येथून अटक केली असल्याची माहिती पुणे शहर पोलिसांच्या परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.

पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला त्याच्या गावी जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला ताब्यात घेऊन त्याला पुण्यात आणण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला आज, शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. बलात्काराच्या घटनेनंतर गाडे पुणे शहरातून पळून गेला होता. त्याने शिरूर येथे नातेवाईकाच्या घरात आश...