Pune, फेब्रुवारी 4 -- Truck-Bike Collision In Pune: पुण्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूरजवळ बेल्हा- जेजुरी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात मायलेकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (३ फेब्रुवारी २०२३) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. शिक्रापूर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजया दिलीप डोके (वय, ४५), संकेत दिलीप डोके (वय, २०) आणि ओंकार सुक्रे (वय,२०) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी संकेत त्याची आई विजयाला नातेवाईकांच्या घरी पुजेच्या कार्यक्रमाला सोडण्यासाठी दुचाकीहून चालला होता. परंतु, येताना संकेतसोबत कोणी नसल्याने त्याने जिवलग मित्र ओंकार सुक्रे यालाही बरोबर घेतले. मात्र, धामारी येथे वळणावर शिक...