Mumbai, फेब्रुवारी 7 -- Valentines Week: प्रेमाचा आठवडा म्हटले जाणाऱ्या व्हॅलेंटाईन वीकला आजपासून सुरुवात झाली. या आठवड्यात प्रत्येक जण आपल्या जोडीदाराबद्दल प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन वीकमधील सगळेच डे खास असतात, पण प्रपोज डेला विशेष महत्त्व आहे. लोक या दिवसाचा उपयोग त्यांच्या नात्यात पुढचे पाऊल टाकण्यासाठी आणि रोमँटिक किंवा खास पद्धतीने आपल्या जोडीदाराला प्रपोज करून आपले प्रेम व्यक्त करतात. दरम्यान, आज आपण प्रपोज डेचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊयात.

प्रपोज डेची सुरुवात व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून झाली असे मानले जाते, जे शतकानुशतके पाळले जात आहे. परंतु, व्हॅलेंटाईन वीक आणि त्याच्याशी संबंधित दिवसांची उत्पत्ती पाश्चिमात्य जगात झाली, असे मानले जाते. त्यानंतर ते भारतासह इतर देशांमध्ये पसरले आहे. प्रपोज डेचा इत...