Mumbai, एप्रिल 9 -- PBKS vs CSK IPL 2025 : पंजाब किंग्जचा सलामीवीर प्रियांश आर्य याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शानदार शतक (१०३) झळकावले. संघ मालक प्रीती झिंटा आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनीज्याप्रकारे प्रियांशचे हे शतक साजरे केले, त्यावरून ही खेळी किती महत्त्वाची होती हे दिसून आले.

सामन्यानंतर, प्रीती झिंटाने प्रियांश आर्यची भेट घेतली आणि या शानदार खेळीबद्दल त्याचे अभिनंदन केले.

वास्तविक, आयपीएल २०२५ चा २२वा सामना पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. मुल्लानपूरच्या स्टेडियमवर पंजाब किंग्जने ८३ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या, पण दुसऱ्या टोकाला प्रियांश आर्यने त्याची स्फोटक खेळी सुरू ठेवली. त्याने ४२ चेंडूत ९ षटकार आणि ७ चौकारांसह १०३ धावांची खेळी केली.

पंजाबने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. पण त्यांची सुरुवात ...