भारत, सप्टेंबर 20 -- Priyanka Chopra In UN: बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण करताना जगात सगळं काही ठीक नसल्याचं म्हटलं आहे. इन्स्टाग्रामवरून प्रियांका चोप्राने तिच्या भाषणाचा व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिच्यासोबत मलाला युसुफजाई, अमांडा गोर्मन, सोमाया फारूकी, जुडिथ हिल यासुद्धा दिसतात. भाषणातून प्रियांका चोप्राने जगासमोर असलेल्या अनेक समस्या अन् प्रश्न उपस्थित केले. प्रियांका चोप्रा ही संयुक्त राष्ट्रांची सदिच्छा दूत आहे.

प्रियांका चोप्राने संयुक्त राष्ट्रात भाषण करताना जगभरातील गरीबी, भूकबळी, स्थलांतर, असमानता, वाढता संघर्ष, वातावरण बदल, जागतिक महामारी इत्यादींमुळे लोकांच्या आयुष्यावर परिणाम होत असल्याचं म्हटलं. यामुळे जगाचा पाया पुन्हा कमकुवत होत आहे, आपण यासाठी बऱ्याच काळापासून ...