Mumbai, जानेवारी 31 -- Priyanka Chopra Casting Couch Experience : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत मजल मारत तिने बराच मोठा पल्ला गाठला आहे. मात्र, या प्रवासात तिचा आत्मविश्वास मोडण्याचा प्रयत्न करणारे लोकही तिला भरपूर भेटले. खुद्द प्रियांकाने एका कार्यक्रमात याबद्दल काही गोष्टी सांगितल्या. यावेळी प्रियांकाने कास्टिंग काऊचचा अनुभव देखील शेअर केला.

फोर्ब्स पॉवर वुमन समिटमध्ये प्रियांका चोप्रा म्हणाली, 'मी त्यावेळी १९ वर्षांची होते. एका दिग्दर्शकाकडे कामासाठी बोलायला गेले होते. मी त्याला म्हणाले की, तुम्ही माझ्या स्टायलिस्टशी बोलाल का? तुम्हाला नेमकं काय हवंय ते सांगाल का? आणि मी तिथेच उभी होते. ती फोनवर माझ्या समोरच्या माझ्या स्टायलिस्टला म्हणाली की, 'ऐका,...