Mumbai, फेब्रुवारी 12 -- Prajakta Mali New Marathi Movie: मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची आणि चर्चित अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्राजक्ता माळी लवकरच 'भिशी मित्र मंडळ' सुरू करणार आहे. आता तिची ही 'भिशी मित्र मंडळ' एखादी संस्था किंवा गट नसून, तिचा आगामी धमाल चित्रपट आहे. कॉमेडी, धमाल आणि निखळ हास्याचा धबधबा असणारे एक जबरदस्त कथानक या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच प्राजक्ता माळी हिने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून, या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिये मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सध्या अग्रक्रमी आहे. आजवर अनेक चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. आता ती 'भिशी मित्र मंडळ' या...