New Delhi, मार्च 29 -- CBI on praful patel corruption case : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०१७ मधील भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयनं (CBI) पटेल यांना क्लीन चिट दिली आहे.

मे २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयनं प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. एअर इंडियासाठी विमानं भाड्यानं घेताना पटेल यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणी पटेल यांच्यासह नागरी हवाई उड्डाण मंत्रालय आणि एअर इंडियाच्या अनेक अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली.

हेही वाचा: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ८ उमेदवार जाहीर; ठाणे, नाशिकसह कल्याणची घोषणाही टाळली!

तब्बल सात वर्षांच्या तपासानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सीबीआयनं हा तपास बंद केला आहे...