Mumbai, जानेवारी 27 -- Pradosh Vrat And Masik Shivratri In Marathi : हिंदू धर्मात प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीला खूप महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत येते आणि चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री येते. प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्रीला भगवान शंकराची पूजा केली जाते. पौष महिन्यात प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री एकाच दिवशी म्हणजे आज २७ जानेवारीला आले आहे.

आज, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला एक विशेष आणि दुर्मिळ योगायोग घडत आहे - भाद्रवस योग. हा योग पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो, विशेषत: भगवान शिव आणि माता पार्वतीच्या उपासनेच्या संदर्भात. या योगाच्या प्रभावाने उपासकाला इच्छित फळ मिळते. भाद्रावस योगात उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील समस्या दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धीचा मार्ग मो...