भारत, जानेवारी 28 -- Pradosh Vrat : फेब्रुवारी महिन्यातील प्रदोषाचे व्रत भोलेनाथांना समर्पित आहे. फेब्रुवारीमध्ये प्रदोष व्रताची तिथी 2 वेळा येत आहे. एक म्हणजे रवी प्रदोष व्रत आणि दुसरे भूम प्रदोष व्रत. प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी भगवान शिव आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची पूजा केली जाते. असे मानले जाते की प्रदोषाचे व्रत केल्याने भक्ताचे सुख आणि सौभाग्य वाढते. जाणून घेऊया फेब्रुवारी महिन्यात प्रदोष व्रत केव्हा केले जाईल, पूजेची पद्धत, मंत्र आणि शुभ मुहूर्त -

दृक पंचांगानुसार फेब्रुवारी महिन्यातील शुक्ल त्रयोदशी तिथी ०९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, जी १० फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत राहील. अशा तऱ्हेने फेब्रुवारी महिन्यातील पहिले शुक्ल प्रदोष व्रत ०९ फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे. तर फेब्रुवारीमहिन्याची कृष्ण त्रयोदशी तिथी २५ फेब्रुवार...