New york, मे 8 -- Porn Star Stormy Daniels on Donald Trump : प्रसिद्ध पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नात्याबाबत अनेक चर्चा अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. २०१६ मध्ये ट्रम्प यांचे एका पॉर्न स्टारसोबत असलेले संबंध उघड झाल्याने खळबळ उडाली होती. त्यांचे हे संबंध लपवण्यासाठी ट्रम्प यांनी पॉर्न स्टार स्टॉर्मीला १ लाख ३० हजार डॉलर्स दिले होते. या प्रकरणी स्टॉर्मीने अमेरिकन कोर्टात साक्ष दिली आहे. मंगळवारी न्यायालयात तिने दोघांचे शारीरिक संबंध व पैसे घेण्याबाबत झालेल्या व्यवहाराबद्दल माहिती दिली.

पॉर्न स्टार स्टॉर्मीने कोर्टात दिलेल्या साक्षीदरम्यान, दोघांच्याही नात्याच्या अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. डॅनियल्सने ट्रम्पसोबत घालवलेल्या एका रात्रीबाबत कोर्टात तपशीलवार माहिती दिली आ...