Mumbai, जानेवारी 28 -- Pori Tujha Mukhda Marathi Song : सध्या सर्वत्र रोमँटिक गाण्यांची जोरदार धूम आहे. अशी अनेक गाणी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. यातच आता या गाण्यांमध्ये एक नव्या हिट गाण्याचा यादीत समावेश झाला आहे. या गाण्याचं नाव आणि बोल 'पोरी तुझा मुखडा' असे आहे. या गाण्यात सर्वांचा लाडका कलाकार निक शिंदे मुख्य भूमिकेत दिसला आहे. या गाण्याने आता त्याच्या रोमँटिक गाण्यांमधील यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

निक शिंदे आणि रोमँटिक गाणी याचं एक चांगलं समीकरण तयार झालं आहे. 'पोरी तुझा मुखडा' हे गाणं त्याच्या सुपरहिट गाण्यांपैकी एक असून, नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात प्रियकराची आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी असलेली हुरहूर आणि त्या भेटीच्या तयारीत त्याच्या मनात येणारे अनेक प्रश्न रंजकपणे दाखवण्यात आले आहेत. 'ती कशी दि...