New delhi, एप्रिल 15 -- PM Modi Interview Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या आधी वृत्तसंस्था ANI ला दिलेल्या मुलाखतीत इलेक्टोरल बॉन्डबाबत म्हटले की, देशाला पुन्हा एकदा काळ्या धनाकडे ढकललं आहे. त्यांनी म्हटले की, निवडणुका काळ्या पैशापासून मुक्त करण्यासाठी इलेक्टोरल बॉन्ड योजना सुरू करण्यात आली होती. मात्र ही योजना रद्द केल्यामुळे निवडणुकात काळ्या पैशाचा वापर वाढताना दिसत आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, हे देशासाठी खूपच धोकादायक आहे. त्यांनी इशारा देताना म्हटले की, याचा विरोध करणारे लोक या मुद्द्यावर भविष्यात पश्चाताप करतील.

पंतप्रधान नरेंद्रमोदींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर इलेक्टोरल बॉन्ड्स स्कीमबाबत खोटा प्रचार केल्याचा आरोप केला. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, निवडणूक रोखे योजना निवडणुकीत होण्याच्या काळ्य पैशांच्...