भारत, एप्रिल 15 -- लोकसभेची लडाई आता न्यायालयात पोहोचली आहे. दिल्ली हायकोर्टात (delhi high court) एका वकीलाने याचिका दाखल करत (Plea against pm Narendra modi) मागणी केली आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ६ वर्षापर्यंत निवडणूक लढण्यास बंदी घालावी. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले की, लोकसभा निवडणुकीच्या (lok sabha polls) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कथितरित्या देव व धार्मिक स्थळांच्या नावावर मते मागून आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांना निवडणूक लढण्यापासून रोखले पाहिजे.

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल या याचिकेत म्हटले आहे की,लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यांनी देवाच्या नावावर मते मागितली आहेत.

आनंद एस. जोंधळे नावाच्या वकिलांनी ह...