New delhi, जानेवारी 27 -- PM Kisan 19th Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात १९ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले जातील. पीएम किसान योजनेच्या १९ व्या हप्त्याची तारीख निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात २४ फेब्रुवारी रोजी बिहारमधून १९ वा हप्ता जारी करणार आहेत. कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही माहिती दिली आहे. सरकारने यापूर्वी ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातून १८ वा हप्ता जारी केला होता.

पीएम किसान योजनेचे उद्दीष्ट लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे आहे, ज्यामुळे त्यांना देशाची उत्पादकता वाढविणे आणि त्यांची उपजीविका सुरक्षित करणे शक्य होईल. फेब्रुवारी २०१९ मध्ये ही योजना सुरू झाल्याप...