MAHAKUMBH NAGAR (PRAYAGRAJ), फेब्रुवारी 4 -- पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी, ५ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील महाकुंभला भेट देणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान गंगा आणि यमुनेच्या संगमावर स्नान आणि गंगा आरती करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी सुमारे अडीच तास प्रयागराजमध्ये राहणार आहेत. कुंभमेळ्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान त्यांच्या आधीच्या प्रोटोकॉलशीटनुसार नेत्रकुंभ आणि राज्याच्या मंडपाला भेट देणार नाहीत. मोदी सकाळी १० वाजता बमरौली विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता हेलिकॉप्टरने डीपीएस हेलिपॅडवर पोहोचतील.

पंतप्रधान मोदी अरैल घाटातून बोटीने संगमाकडे रवाना होतील आणि सकाळी ११ वाजता तेथे पोहोचतील. तेथे कुंभमेळ्यात पवित्र स्नान क...