Nagpur, एप्रिल 20 -- लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत मार्फत राज्यातील १० हजार पात्र महिलाना "पिंक ई रिक्षा" योजनेचा लाभ देण्यात आला. रविवारी (२० एप्रिल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत महिलांना पिंक रिक्षांचे वाटप करण्यात आले. या योजनेची नागपूरात सुरुवात झाली असून राज्यातील एकूण ८ जिल्ह्यात १० हजार पिंक ई-रिक्षांचे वाटप केले जात आहे.

नागपूरसोबतच पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि अमरावती या आठ जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने पिंक रिक्षा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पिंक रिक्षाच्या एकूण किमती पैकी २० टक्के अनुदान राज्य सरकार देणार असून दहा टक्के रक्कम लाभार्थी महिलांना द्यावी लागणार आहे. तर उर्वरित ७०टक्के रक्कम सवल...