Pune, एप्रिल 14 -- Pimpri-chinchwad crime : पिंपरी- चिंचवडमध्ये नवजात बालकांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश वाकड पोलिसांनी केला असून ६ महिलांना अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलांमध्ये एक परिचारिकेचा समावेश असून ती या टोळीची प्रमुख असल्याची माहिती देखील तपसात पुढे आली आहे. सर्व आरोपी महिलांना १६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने ठोठावली आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी- चिंचवड शहरातील वाकड येथे नवजात बालकांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या मागे मोठी टोळी असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. दरम्यान, या टोळीतील काही सदस्य हे काही बाळकांची विक्री करण्यासाठी जगताप डेअरी येथे येणार असल्याचे पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून कळले. दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारावर वाकड पोलिसांनी सापळा रचला. शुक्...