Amravati, फेब्रुवारी 14 -- राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेयांनी शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. पिक विम्याबाबत बोलताना कोकाटे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विचार करा भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयामध्ये पिक विमा दिला, असे वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलताना कृषीमंत्र्यांची जीभ घसरली.

सरकारच्यापिक विमा योजनेबद्दल सांगताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याची तुलना थेट भिकाऱ्याशी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटले आहे. एक रुपयात पिक विमा ही योजना बंद होणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत कृषिमंत्री कोकाटे यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण होण्याची शक्यत...