भारत, फेब्रुवारी 4 -- तातडीने पैशाची गरज निर्माण झाल्यानंतर अनेक जण एकतर पर्सनल लोन घेण्याचा पर्याय निवडतात किंवा मग क्रेडिट कार्डचा वापर करून लोन घेत असतात. मात्र दोन्ही माध्यमातून लोन घेताना संपूर्ण तपशील जाणून घेणे आवश्यक असते. जर तुमच्याकडे एक किंवा अधिक क्रेडिट कार्ड असतील आणि तुम्हाला आर्थिक गरज तातडीने पूर्ण करायची असल्यास दोनपैकी एक पर्याय निवडू शकता. एकतर कर्जउभे करू शकता किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकता. अनेक जण यातील नेमक्या कोणत्या पर्यायाकडे जायचे या द्विधा मनस्थितीत असतात. तुम्हाला जर अल्प काळासाठी लोन घ्यायचे असेल तेव्हा दोन्ही पर्याय चांगले असू शकतात. परंतु दीर्घ काळासाठी लोन घ्यायचे असल्यास ठोस निर्णय घेण्यापूर्वी खालील बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.

१.व्याजदर : बँकद्वारे पर्सनल लोनवर आकारला जाणारा व्याजदर हा क्रे...