Patna, एप्रिल 25 -- Patna Hotels Fire News: पाटणा रेल्वे स्थानकापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या हॉटेलच्या तीन इमारतींना गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर, अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. पाल हॉटेलला लागलेली ही आग आटोक्यात येण्यापूर्वीच आजूबाजूच्या इमारतींमध्ये पसरली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हॉटेल पाल आणि लगतच्या अमृत हॉटेलमधून त्यांना मृतदेह सापडले. अनेकांनाा बाहेर काढून पाटणा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.

गुरुवारी दुपारी आमच्या रुग्णालयात दाखल झालेल्या एकूण १८ जणांपैकी गंभीररित्या होरपळलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला. शस्त्रक्रिया विभागात उपचार घेत असलेल्या १०० टक्के आणि ९५ टक्के भाजलेल्या इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत सहा जणांची अद्याप ओळख पटलेली नाही,'...