New Delhi, जानेवारी 24 -- योगगुरू रामदेव बाबा यांच्या मालकीची कंपनी असलेल्या पतंजली फूड्स लिमिटेडने बाजारातून ४ टन लाल मिरची पावडर परत मागवली आहे. पतंजली कंपनीने अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे डबाबंद लाल मिरची पावडरची विशिष्ट खेप परत मागविण्याचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) ने कंपनीला दिले आहेत.

याबाबत बोलताना पतंजली फूड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव अस्थाना म्हणाले, 'पतंजली फूड्सद्वारे विकण्यात येत असलेल्या २०० ग्रॅम वजनाचे पॅकेट असलेल्या मिरची पावडरच्या पॅकेटच्या नमुन्यांची तपासणी केली असता त्यात कीटकनाशकांच्या अवशेषांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले आहे. त्यामुळे चार टन लाल मिरची पावडर बाजारातून परत मागवण्यात आली आहे. FSSAI द्वारे लाल मिरची पावडरसह विविध खाद्यपदार्थांसाठी कीटकनाशक अवशे...