Mumbai, फेब्रुवारी 3 -- ग्रहांच्या राशीतील बदलाचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर नक्कीच होतो. राशीच्या बदलासोबतच ग्रहांचा इतर ग्रहांशी संयोग होऊन अनेक प्रकारचे योग तयार होतात. शुक्र आणि गुरु या दोन प्रमुख ग्रहांच्या संयोगामुळे परिवर्तन योग तयार झाला आहे. शुक्र २९ जानेवारीला मीन राशीत दाखल झाला आहे. दुसरीकडे गुरू सध्या वृषभ राशीत आहे. गुरू मीन राशीचा स्वामी आणि शुक्र वृषभ राशीचा स्वामी आहे.

वैदिक ज्योतिषात शुक्र हा प्रेम, सौंदर्य, आनंद, ऐश्वर्य, संपत्ती आणि विवाहासाठी जबाबदार ग्रह मानला जातो. वास्तविक, शुक्र सध्या मीन राशीत आहे आणि मीनचा स्वामी ग्रह गुरू आहे. शुक्र आणि गुरु यांच्यात शत्रूत्वाचे नाते आहे. दुसरीकडे, देवगुरु बृहस्पति त्याच्या शत्रू शुक्र ग्रहाच्या वृषभ राशीमध्ये आहे. अशा प्रकारे शुक्र आणि गुरू एकमेकांच्या राशीत असल्यामुळे परि...