Mumbai, फेब्रुवारी 6 -- Palmistry Ring Finger : समुद्र शास्त्रामध्ये, व्यक्तीच्या भूतकाळ, भविष्य आणि वर्तमानाशी संबंधित गोष्टी किंवा घटनांचे मूल्यमापन त्याच्या शरीराच्या अवयवांच्या संरचनेवरून केले जाते. शरीराचे अवयव देखील व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व, करिअर आणि आर्थिक स्थिती दर्शवतात. हाताच्या बोटांच्या आकारावरून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किती पैसा येईल आणि त्याचे आयुष्य कसे असेल इत्यादी गोष्टी कळू शकतात.

हातावरील रेषा, चिन्हे आणि बनावट पाहून एखादा व्यक्ती भाग्यशाली आहे किंवा नाही, हे सांगितले जाऊ शकते. आपल्या हाताला आणि पायाला असलेली सगळी बोटं ही कामाची आहेत. कोणत्याही बोटाला आपण निरुपयोगी किंवा कामाचं नाही, असं म्हणू शकत नाही. दैनंदिन कामात प्रत्येक बोटाला महत्त्व आहे; पण आपल्या हाताची सर्व बोटं सारखी नाहीत. या बोटांवर अनेक चिन्ह आ...