Mumbai, फेब्रुवारी 15 -- Palmistry in Marathi: हस्तरेखाशास्त्र म्हणजे हातरेषांचा अभ्यास. तळहातावर अनेक रेषा आणि खुणा तयार होतात. हातावर तयार झालेल्या काही शुभ चिन्हांमुळे जातकाचे नशीब बदलते, परंतु उलट काही रेषा किंवा खुणा दुर्दैवास कारणीभूत ठरतात. हस्तरेखाशास्त्रात काही खुणा किंवा रेषा अशुभ मानल्या जातात. या रेषांच्या प्रभावामुळे माणूस संपत्ती संचय करू शकत नाही. अनेकदा आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागते.

हस्तरेखाशास्त्रानुसार ज्या व्यक्तींच्या तळहातावर राहूची रेषा असते, त्यांचे जीवन दु:खांनी भरलेले असते. या रेषेला चिंता रेषा, ताण रेषा किंवा अडथळा रेषा असेही म्हणतात. या रेषेमुळे व्यक्तीला शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते, असे म्हटले जाते.

हस्तरेखाशास्त्रानुसार ज्या लोकांच्या फाटलेल्या व तिरक्या रेषा तळहातातील इतर रेषा कापून टाकतात, अ...